शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रुह अफझा सरबत बाजारातून का गायब झाले?

भारतीय बाजारातून रुह अफझा सरबत अचानक गायब झाले. उन्हाळ्यात लोकांना याची कमी जाणवतं आहे. दरम्यान रमजान महिना देखील सुरू झाला आहे. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर मुस्लिम संध्याकाळी इफ्तारच्या वेळी रूह अफझा सरबत सेवन करणे पसंत करतात. अशात सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरले आहे सरबत की काय कारण आहे की मार्केटमधून गायब आहे हे सरबत?
 
एका भारतीय वेबसाइटने आपल्या लेखमध्ये लिहिले आहे की भारतीय बाजारात रुह अफझाची विक्री मागील चार-पाच महिन्यांपासून बंद आहे आणि हे ऑनलाईन देखील उपलब्ध नाही. कच्च्या मालाचा पुरवठा कमीमुळे उत्पादन बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
तसेच हमदर्दचे संस्थापक हकीम हाफिज अब्दुल मजीद यांचा नातू अब्दुल मजीद आणि त्याच्या चुलत भाऊ हामिद अहमद यांच्यात कंपनीवर नियंत्रण यावरून वाद आहे असे म्हटलं जात आहे. 
 
कुटुंबातील वादामुळे उत्पादन बंद केल्याचा दावा देखील केला जात आहे. आणि जेव्हा उत्पादन सुरू होईल बाजारात पुन्हा सरबत दिसू लागेल.
 
रुह अफझा निर्माण कंपनी हमदर्दचे एमडी आणि सीईओ उस्मा कुरैशीने ट्विट करून सांगितले की आम्ही भारतात रमजानमध्ये सहज रुह अफझा पाठवू शकतो. भारत सरकारने परवानगी दिली 
 
तर आम्ही हम वाघा बार्डरच्या रस्त्याने ट्रक सहज पाठवू शकतो.