सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2019 (11:48 IST)

अमेरिकेत दोन विमानांची हवेत टक्कर, 5 जणांचा मृत्यू

अलास्का- अमेरिकेतील अलास्कात येथे दोन विमानांची हवेत टक्कर झाल्याची बातमी आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात अपघातात 10 जण जखमी आहेत. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
 
माहितीनुसार अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरात हा अपघात झाला. दोन विमानाची हवेत टक्कर झाली. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी होती. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.