1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 (11:49 IST)

ईशा महाशिवरात्री सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

Defence Minister Rajnath Singh and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis attend Isha Mahashivratri celebrations
"मला येथे जी दैवी अनुभूती येत आहे, यावरून हे स्पष्ट होते की, हे ठिकाण देवाधिदेव महादेवाच्या आशीर्वादाने पुनीत झाले आहे," असे उद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी काढले. कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात आयोजित महाशिवरात्री उत्सवात ते बोलत होते. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत चालणाऱ्या या भव्य वार्षिक सांस्कृतिक सोहळ्याला माननीय संरक्षण मंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री राजनाथ सिंह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तिमत्व आणि इतर मान्यवर उपस्थित होते, तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील नेते, अभिनेते, गायक आणि कलाकार उपस्थित होते. महाशिवरात्री हा ईशाचा दरवर्षी आदियोगींच्या उपस्थितीत होणारा सर्वात भव्य वार्षिक उत्सव आहे. सद्गुरू रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमाला मार्गदर्शित करतात.
 
"जेव्हा मानवता तणाव, चिंता आणि आंतरिक अस्वस्थतेतून जात असते, तेव्हा भगवान शिवाचा संदर्भ आणखी सखोलपणे जाणवतो. शिव ही एक जिवंत शक्यता आहे, एक अशी शक्यता जी आपल्याला गोंधळाच्या वातावरणात देखील संतुलन कसे राखायचे हे दर्शवते. ते परिपूर्ण आंतरिक शांती आणि त्याच वेळी कर्तृत्व आणि परिवर्तनाचे प्रतीक आहेत," असे संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की, सद्गुरूंनी महाशिवरात्रीला "आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक उत्सव" बनवला आहे, "अध्यात्म हे एक विज्ञान आहे, जे जीवन अधिक प्रभावी आणि संतुलित बनवते" हे त्यांनी दाखवून दिले आहे.
उपस्थित राहणारे इतर प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री डॉ. एल. मुरुगन; देशभरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, आध्यात्मिक नेते आणि कलाकार देखील या महासमारंभाला उपस्थित होते.
 
संध्याकाळी, सद्गुरूंनी योग केंद्रात श्री राजनाथ सिंह यांचे स्वागत केले, त्यांच्यासह इतर मंत्री, मान्यवर हे सद्गुरूंनी ध्यानलिंग मंदिरात आयोजित केलेल्या पंचभूत क्रियेमध्ये (पाच तत्वांचे शुद्धीकरण) सहभागी झाले, ध्यानलिंग हे एक अद्वितीय आणि शक्तिशाली ऊर्जा स्वरूप आहे, जे सद्गुरूंनी मुक्तीचे प्रवेशद्वार म्हणून प्राणप्रतिष्ठित केले आहे.
 
यानंतर सर्वांना उत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या प्रतिष्ठित आदियोगी येथे घेऊन जाण्यात आले. संरक्षण मंत्र्यांनी योगेश्वर लिंगाला कैलास तीर्थ अर्पण केले आणि जगभरात योगाचा प्रसार करण्याचे प्रतीक म्हणून महायोग यज्ञ प्रज्वलित करून रात्रभर चालणाऱ्या उत्सवाचा आरंभ केला. भव्य लिंग भैरवी उत्सवमूर्ती मिरवणूक आणि महाआरतीने उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
 
कार्यक्रमात मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत करताना, सद्गुरूंनी आदियोगींच्या प्रासंगिकतेबद्दल आणि समकालीन काळात अनुरूप असलेल्या त्यांच्या संदेशाबद्दल सांगितले. "आदियोगी हे भूतकाळातील नाहीत. तर आदियोगी भविष्यातील आहेत, कारण त्यांनी जे प्रदान केले आहे ते विश्वासप्रणाली, तत्वज्ञान, विचारधारा किंवा शिकवणी नाहीत, तर ते कल्याणासाठीचे तंत्रज्ञान आहेत." ते म्हणाले की, पुढील एक-दोन दशकांत, "आम्ही कल्याणाच्या तंत्रज्ञानाला (जागतिक स्तरावर) एक महत्वाची शक्ती बनताना पाहू इच्छितो. वर पाहणे नाही. तर आत पाहणे हाच एकमेव मार्ग आहे."
 
सद्गुरूंनी ‘भव्य भारत भूषण’ पुरस्कार देखील सुरू केला आहे, जो "भव्य भारताच्या उभारणीत योगदान दिलेल्या किंवा देत असणाऱ्यांना" सन्मानित करण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. संरक्षण मंत्र्यांनी हा पुरस्कार प्रदान केला: प्राप्तकर्त्यांमध्ये श्री नंबी नारायण आणि श्री किरण कुमार (विज्ञान आणि तंत्रज्ञान), श्रीमती अलार्मेल वल्ली (शास्त्रीय नृत्य), श्रीमती एन राजम (संगीत), श्री विक्रम संपत (इतिहास आणि संस्कृती), श्रीमती सायना नेहवाल (क्रीडा), एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, लेफ्टनंट जनरल एव्हीएस राठी आणि व्हाइस ॲडमिरल आर व्ही गोखले (ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ) हे मान्यवर समाविष्ट होते.
 
"गंगा" या संकल्पनेवर आधारित या वर्षीच्या महाशिवरात्रीत पवित्र नदीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पैलू अधोरेखित करण्यात आले. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शक्तिशाली ध्यान, उत्साही संगीत आणि नृत्य सादरीकरणे आणि भारताच्या नामांकित कलाकारांचे कलाविष्कार सादर केले जातील.