गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानात महागाई भडकली, सफरचंद 400 रुपये किलो तर संत्री 360 रुपये डझन

कराची- पाकिस्तानची खराब स्थिती आता येथील लोकांवर भारी पडतेय. आर्थिक रूपाने कमजोर पाकिस्तानची स्थिती अजून वाईट होत चालली आहे. इम्रान सरकाराला महागाई मात करण्यात अपयश आले आहे.
 
खाण्या-पिण्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. रमजानमध्ये फळांची मागणी असल्यामुळे आता सफरचंद 400 रुपये किलो, संत्री 360 रुपये आणि केळी 150 रुपये डझन या भावाने विकले जात आहे. बातम्यांप्रमाणे शहरातील अनेक लोक महागाई विरोधात प्रदर्शन करत आहे.
 
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाच्या भावात निरंतर घट झाल्यामुळे हे दक्षिण आशियाच्या प्रमुख चलन तुलनेत सर्वात कमजोर स्थितीत पोहचले आहे. ब्‍लूमबर्ग रिपोर्टनुसार पाकिस्तानी मुद्रा आशियाच्या 13 इतर चलनांमध्ये सर्वात वाईट प्रदर्शन करणारी करेंसी आहे. यात सुमारे 20 टक्क्यांपर्यंत घट झालेली दिसून येत आहे.
 
खाण्या पिण्याच्या वस्तू महाग झाल्या 
पाकिस्तानमध्ये एक डझन संत्री 360 रुपये तर लिंबू आणि सफरचंद यांच्या किमती 400 रुपये किलो पर्यंत पोहचल्या आहेत. पाकच्या लोकांना 150 रुपये डझन केळी, मटण 1100 रुपये किलो, चिकन 320 रुपये किलो आणि एक लीटर दुधासाठी 120 ते 180 रुपये पर्यंत खर्च करावे लागताय. महागाईमुळे आक्रोशीत लोकं सोशल मीडियावर आपला राग काढत आहे.
 
हे पाऊल उचलत आहे इम्रान सरकार 
घसरत असलेली अर्थव्यवस्था बघत पाकिस्तान सेंट्रल बँक एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. सेंट्रल बँक व्याज दरावर मोठी घोषणा करत रुपया सांभाळण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकते. एक समिती गठित करण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे.
 
इम्रान सरकार पर्यटनासाठी परदेशात जात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मर्यादित डॉलर देण्याचा निर्णय घेऊ शकते. ही रक्कम 10,000 डॉलरहून घसरून 3,000 डॉलर करण्यात येऊ शकते. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या खजिन्यातून एका वर्षात 2 अब्ज डॉलरहून अधिक वाचू शकतील.