शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

'म्हणून' किम जोंगने राजदुतासह पाच जणांना मृत्यूदंड दिला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने राजदुतासह पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती. पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून या बैठकीचं नियोजन करणाऱ्या राजदुतासह इतर चार अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
या वृत्तानुसार, किम जोंगसोबत विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून या पाच जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब चाचणीनंतर अमेरिकेसोबतचे संबंध प्रचंड बिघडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी 2018 मध्ये सिंगापूरमध्ये, तर फेब्रुवारी 2019 ला हनोईमध्ये बैठक झाली. पण कोणताही तोडगा निघाला नाही.