बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (16:38 IST)

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारहाण करणाऱ्या युवकांनी झोमॅटोवरुन ऑर्डर दिली होती. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ऑर्डर पोहोचवली. मात्र त्याचवेळी ऑर्डरवरुन त्यांच्यात बाचाबाची झाली आणि या टोळक्याने त्याला मारहाण केली. ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्याचा आरोप करत या टोळक्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण कदम असं मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयं नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणारे युवक पसार झाले आहेत.