शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यात गुंडांचा पुन्हा राडा, दहशत माजवत फोडल्या अनेक गाड्या

परिसरात दहशत माजवण्यासाठी किंवा भांडणाचा वचपा काढण्यासाठी पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड केलेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अश्या पद्धतीने  एका टोळक्याने धारदार शस्त्राने ५ ते ६ वाहनांची तोडफोड केली असून घटना मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमागील परिसरात घडली आहे. या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेत या  परिसरात आरोडाओरड करत दहशत माजवण्याचा जोरदार प्रयत्न केला. 
 
तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचांवर दगड फेकून आणि धारदार शस्त्राने वार करून नुकसान केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून पोलिसांमध्ये तक्रार देण्यास कोणी पुढे आले नाही.मागील काही दिवसापूर्वी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमद्ये १० ते १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री मंगळवार पेठेत ही घटना घडली आहे. 
 
पुणे शहराच्या उपनगर भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडत असताना शहराच्या मध्यवस्तीमध्य असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्य भितीचे वातावरण आहे. या घटनेची फरासखाना पोलिसांनी दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.