शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नराधम बापाचे कृत्य अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला बाहेर नाही तर घरात सुरक्षित नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. 
 
पुणे जिल्ह्यातील मरकळ (ता. खेड) येथे एका नराधम सावत्र बापाने त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी घडली असून, फिर्यादी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आरोपी आणि फिर्यादी महिला हे एकाच कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळीमध्ये काम करत होते. फिर्यादी महिलेचा आरोपीसोबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला होता. रविवारी आरोपी रात्रपाळी करुन घरी परतला. त्यावेळी मुलीची आई दिवसपाळीमध्ये कामाला गेली होती. घरात पीडित मुलगी आणि सावत्र वडील दोघेच होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सावत्र बापाने मुलीवर बळजबरी करत बलात्कार केला आहे. जेव्हा या मुलीची आई संध्याकाळी नोकरीवरून परत घरी आली तेव्हा पीडित मुलीने याबाबत तिला सर्व सांगितले. त्यानंतर आईने थेट आळंदी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. 
 
आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशचा असून मुलीची आई अरुणाचल प्रदेश येथील आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.