रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गँगरॅप, हत्येतील आरोपी आमदाराला तुरुंगात भेटले साक्षी महाराज, धन्यवाद म्हटले

उत्तरप्रदेशच्या उन्नाव मतदारसंघातून जिंकलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज बुधवारी सीतापूरला आल्यावर त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरची तुरुंगात भेट घेलती. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे आभार मानण्यासाठी ते तिथे पोहचले होते.
 
दोघांमध्ये खूपवेळ चर्चा झाली आणि साक्षी महाराजांनी कुलदीप सिंह यांना यशस्वी आणि लोकप्रिय असल्याचे म्हटले. बुधवारी ईदनिमित्त सुट्टी असूनही त्यांना भेटण्याची परवानगी दिल्याबद्दल साक्षी महाराजांनी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले. 
 
बांगरमऊहून आमदार कुलदीप सिंह यांच्यावर 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याने पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आमदाराला अटक करण्यात आली. प्रकरणाची सीबीआय तपास सुरु आहे. कुलदीप चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.