शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2019 (16:49 IST)

जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील Xiaomi चे हे प्रीमियम फोन

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अलीकडे चीनमध्ये आपले प्रीमियम हँडसेट Xiaomi K20 आणि K20 Pro लॉन्च केले होते. कंपनीने हे दोन्ही फोन Oneplus 7 आणि Oneplus 7 Pro ला टक्कर देण्यासाठी सादर केले होते. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे की जुलैमध्ये कंपनी आपले दोन्ही फोन भारतात लॉन्च करू शकते. शाओमी इंडियाच्या एमडीने गेल्या महिन्यात टीज केलं होतं की Redmi K20 आणि Redmi K20 Pro भारतीय बाजारात देखील लॉन्च होतील. तथापि, त्यावेळी लॉन्चिंग तारेखचा उल्लेख करण्यात आले नव्हते.
 
चीनी बाजारात सादर केलेल्या डिव्हाइसेसच्या तपशीलांच्या आधारावर Redmi K20 Pro मध्ये 6.39 इंच ऐमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसह 8 जीबी पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. Redmi K20 Pro मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप (48मेगापिक्सेल +13मेगापिक्सेल +8 मेगापिक्सेल) दिला गेला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेलचा पॉप-अप कॅमेरा दिला गेला आहे. पावर बॅकअपसाठी 4000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 
 
Redmi K20 चे तपशील आणि डिझाइन 'Pro' व्हेरिएंट सारखेच आहे, फक्त प्रोसेसर, रॅम आणि बॅटरी च्या दृष्टीने हे थोडे वेगळे आहे. Redmi K20 मध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसह 6GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिलं गेलं आहे.