सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जून 2019 (17:00 IST)

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या नाराज आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तार, भारत भालके, शिवसेनेचे नारायण पाटील आणि माढाचे रणजित निंबाळकर उपस्थित होते.
 
गेल्या काही वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटीलभाजपात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मुख्यमंत्र्यांसोबतची वाढती जवळीकही तेच दर्शवत होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा सुजय विखे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीसेबत मतभेद झाले होते. अहमदनगर राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्यास सांगितल्याचा दावा विखे यांनीच केला होता. यामुळे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगरची उमेदवारी मिळविली होती.