मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2019 (10:42 IST)

मित्रांनी पाजली तिला दारू आणि केला तिच्यावर बलात्कार पुण्यातील घटना

महिला वर्गाने आता अत्यंत सावध भूमिका घेत पुरुष मित्र करणे गरजेचे आहे. कारण पुणे येथे एका महिलेला तिच्या मित्रांनी दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला आहे. या नराधम मित्रानी तिला खोटं कारण सांगून पिसोळी परिसरातील डोंगरावर नेले होते. तर तिच्या मित्रांनीच तिला दारु पाजली व तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. या गंभीर प्रकरणाबाबत 22 वर्षीय तरुणीने  फिर्याद दिली आहे.
 
पीडित तरुणी माळवाडी परिसरातील रहिवासी आहे. मे 2018 साली तिच्या नवऱ्याचे निधन झाल्यामुळे ती लहान मुलाला घेऊन माहेरी राहते. दोन वर्षांपूर्वी तिची नराधम कृष्णा जाधव याच्यासोबत ओळख झाली. दुसरा आरोपी अक्षय हा कृष्णाचा मित्र आहे त्यामुळे त्याच्यासोबतही तिची मैत्री झाली. शनिवारी 25 मे रोजी फिर्यादी घरी असताना तिला अक्षयचा फोन आला आणि कृष्णा जाधव आजारी असल्याचं सांगून भेटण्यासाठी तिला त्याने बोलावले .त्यानंतर अक्षय गाडी घेऊन आला आणि फिर्यादीला तरुणीला घेऊन सोबत गेला. या दोघांना गोंधळेनगर येथे आरोपी कृष्णा भेटला. त्यांनी एका दुकानातून दारू विकत घेतली व हे सर्व पिसोळी येथील डोंगरावर गेले. त्या ठिकाणी दोघा आरोपींनी दारू प्यायली सोबतच पीडितेलाही जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर कृष्णा जाधव याने तिच्यावर बलात्कार केला. अक्षय चव्हाण यानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. तेव्हा अक्षय याने तिला चपलेने जबर मारहाण केली व जबरी बलात्कार केला. आरोपींनी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा सर्व प्रकार जेव्हा घडला तेव्हा फिर्यादी तरुणीने जोरदार ओरडा केला तेव्हा जवळून जाणाऱ्या दोन महिला धावून आल्या. यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. त्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ससून रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे मित्र निवडतांना काळजी घेणे गरजेचे आहे.