बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 24 मे 2019 (10:11 IST)

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत विद्यमान सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल. विद्यमान लोकसभेची मुदत 3 जूनला समाप्त होणार आहे. त्याआधी सतरावी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्‍यक आहे.
 
लोकसभा बरखास्तीचा ठराव मंत्रिमंडळ मंजूर करेल. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद लोकसभा बरखास्तीचे औपचारिक पाऊल उचलतील. पुढील काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून नवनियुक्त लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे सादर केली जाईल. त्यानंतर नवी लोकसभा अस्तित्वात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.