सावधान, फेसबुकनंतर आता इंस्टाग्रामच्या डेटाची चोरी, बर्याच लोकांना लागला झटका
आतापर्यंत आम्ही फेसबुकहून डेटा चोरी होण्याबद्दल ऐकले होते, पण आता इंस्टाग्रामशी निगडित एका नवीन प्रकरणामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. एका रिपोर्टानुसार इंस्टाग्रामहून लाखो प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींचा पर्सनल डेटा लीक झाला आहे. या वृत्ताने सर्वांना हैराण केले आहे, पण अद्याप याची माहिती मिळाली नाही आहे की ते महान व्यक्ती कोण कोण आहेत.
वृत्तानुसार, टेक क्रंचच्या एका रिपोर्टानुसार, इंस्टाग्रामवरून बर्याच प्रसिद्ध लोकांचा वैयक्तिक डेटा लिक झाला आहे. टेक क्रंचने सोमवारी रात्री एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की डेटा बेसमध्ये बरेच हायप्रोफाइल प्रभावशाली लोकांचे 4 कोटी 90 लाख रिकॉर्ड सामील होते, ज्यात प्रामुख्याने फूड ब्लॉगर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि इतर सोशल मीडियातील प्रभावशाली व्यक्ती सामील आहे.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की उपयोगकर्तांनी लिक होणार्या डेटामध्ये फॉलोअर्सची संख्या, बायो, पब्लिक डेटा, प्रोफाइल पिक्चर, लोकेशन आणि पर्सनल काँटॅक्ट देखील सामील आहे, पण जशीच फर्म चॅटरबॉक्सबद्दल टेक क्रंचने ही रिपोर्ट प्रसिद्ध केली तसेच लगेचच डेटाबेसला ऑफलाईन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे की चॅटरबॉक्स एक वेब डेव्हलपमेंट कंपनी आहे जी कंटेंटला वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्रभावितांना भुगतान करते.
इंस्टाग्रामने तपासणी सुरू केली : इंस्टाग्रामच्या एका प्रवक्ते ने म्हटले आहे की आम्ही तपासणी करत आहो की कुठल्या तिसर्या पक्षाने आपल्या धोरणांचे उल्लंघन करत अनुचित पद्धतीने इंस्टाग्राम डेटा संग्रहित केला आहे आणि हे देखील स्पष्ट झालेले नाही की चॅटरबॉक्सच्या डेटाबेसमध्ये फोन नंबर आणि ईमेल इंस्टाग्रामहून आले की नाही? वापकर्त्यांच्या डेटाला चुकीच्या पद्धतीने आणणारे तिसर्या पक्षाची शक्यता काही असू शकते, ज्याला आम्ही गंभीररीत्या घेत आहोत.