बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ऐकाल ते नवल, म्हणे शेणाचा लेप देऊन थंडावा मिळतो

पुण्यातील डॉ नवनाथ दुधाळ यांनी महिंद्रा एक्सयूव्ही ५०० गाडीला शेणाचा लेप देऊन थंडावा मिळवल्याचा दावा केला आहे. आश्चर्य म्हणजे हा लेप सुमारे महिनाभर टिकत असून त्याने गाडीचे किंवा गाडीच्या रंगाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
 
याविषयी दुधाळ म्हणतात की, 'हा उपाय स्वस्त असून गाडीचा रंग किंवा पृष्ठभागावर कोणतेही परिणाम करत नाही. यामुळे आतील वातावरण सुमारे ७ ते ८ अंशांनी कमी होते. हल्ली तर मी एसी न वापरताही गाडीत बसू शकतो. पर्यावरणपूरक असलेल्या उपायात एकच अडचण म्हणजे शेण लावल्यावर काही तास त्याचा वास येतो मात्र गाडी पूर्ण वाळल्यावर हा वासही जातो असे म्हटले आहे.