शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (12:04 IST)

पाकिस्तानचे बुरे दिन; महागाईने गाठला उच्चांक

सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या सरकारसमोर महागाईने आव्हान निर्माण केले आहे. या महागाईमुळे पाकिस्तानच्या जनतेत रोष असून पंतप्रधान इ्रान यांची झोप उडाली आहे. पाकिस्तानमध्ये पीठ, साखर यांसारख्या जीवनाशक्य वस्तूंचे दर वाढले आहेत. पाकिस्तानी चलनानुसार, पीठाचे दर प्रतिकिलो 70 रुपये झाले आहेत. तर, साखरेचा दर 74 रुपये प्रतिकिलो झाल्यामुळे पाकिस्तानी जनता हवालदिल झाली आहे.

दरवाढीसाठी कारणीभूत असणार्‍यांवर आणि साठेबाजी करणारंवर कारवाई करण्याचे आदेश इम्रान यांनी दिले आहेत. इम्रान यांनी जनतेच्या व्यथा समजत असून महागाई कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ट्विटरवर म्हटले. सरकारी संस्थांनी पीठ आणि साखरेच्या दरवाढीची कारणे शोधण्यास सुरूवात केली आहे. दरवाढीसाठी जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.