शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:13 IST)

कोरोना व्हायरसचा भविष्यवाणी करणाऱ्याचा मृत्यू

चीन सरकारला सर्वात आधी कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचं निधन झालं आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ज्या व्हायरबद्दल त्यांनी सरकारला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला त्याचीच लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग यांनी चेतावणी दिल्यानंतरही सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला होता.  १ फेब्रुवारी रोजी ली वेनलियांग यांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं. आणि अखेर पाच दिवसांनी त्यांचं निधन झालं.
 
नेत्रचिकित्सक ३४ वर्षीय ली वेनलियांग वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ३० डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या मित्रांना मेसेज करुन हा व्हायरस वेगाने पसरत असल्याचं सांगितलं होतं. या जीवघेण्या व्हायरसबद्दल सर्वात आधी त्यांनीच चेतावणी दिली होती. 
 
ली वेनलियांग यांनी आपली आणि कुटुंबाची कशी काळजी घ्यावी यासंबंधी एक मेसेज आपल्या शाळकरी मित्रांना पाठवला होता. मात्र काही तासात तो मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे त्यांचं नाव सगळीकडे चर्चेत येऊ लागलं होतं. सोशल मीडियावर अनेक जण त्यांचा हिरो म्हणून उल्लेख करु लागले होते.