शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :टोकियो , शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:13 IST)

3500 प्रवासी असलेल क्रूझवर कोरोनाचा संसर्ग

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी घरातूनबाहेर न पडण्याचे, गर्दीचे ठिकाण टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, भर समुद्रात असलेल्या एका क्रूझवर कोरोनाची लागण झाली आहे. या क्रूझवर 3500 प्रवासी आहेत. यातील 130 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी करणत आली आहे. यातील 60 जण हे नवे रुग्ण आहेत. या क्रूझवर काही भारतीय नागरिक असल्याचीही माहिती समोर आली आहे.
 
'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर ही घटना घडली आहे. जपानच्या या क्रूझवर कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे. जपानमधील वृत्तमाध्यमांनी याची पुष्टी केली आहे. जपानच्या आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. कोरोना विषाणूग्रस्त क्रूझ सध्या जपानच्या  योकोहामा किनार्‍यावर आहे. क्रूझमध्ये 3500 प्रवासी असून यात सहा प्रवासी भारतीय आहेत. तर, क्रूझच्या कर्मचार्‍यांमध्येही  काही भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची मा हिती जपानधील भारतीय दूतावासाने दिली आहे. 
 
दरम्यान, रविवारी क्रूझच्या व्यवस्थापनाने कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रवाशांमध्ये 21 जपानी, पाच ऑस्ट्रेलियन आणि पाच कॅनेडियन नागरिकांचा समावेश असल्याचे म्हटले होते.