शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 11 एप्रिल 2020 (11:26 IST)

कोरोना-19 : सनरायझर्स हैदराबादचे 10 कोटींचे योगदान

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने कोरोनाविरूध्दच्या लढ्यात पी.ए. केअर्स फंडात 10 कोटी रूपयांचे योगदान दिले आहे. संघाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर लिहिले आहे की, सन टीव्ही ग्रुप कोरोना व्हायरसविरूध्दच्या लढ्यात 10 कोटी रूपयांचे योगदान देत आहे.

याबद्दल संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानेही ट्वीट करत सन टीव्ही समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स या संघांनीही योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.