शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 9 एप्रिल 2020 (13:27 IST)

मला वादात टाकायच्या कुरापती सुरू आहेत : पंतप्रधान

पंतप्रधानांचे नुकतेच एक टि्वट आले आहे ज्यात ते आपल्याला वादात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत आहेत. पाच मिनिटे उभे राहून पंतप्रधान मोदी यांचा गौरव करू या अशी मोहीम सुरु असल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आले.

देशभरात अशा प्रकारचा एक संदेश फिरत असल्याची बातमी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली. यामुळे पंतप्रधान नाराज झाले. हे माझ्या सदिच्छांसाठी कदाचित सुरु असेल. कोरोना जाईपर्यंत एखाद्या गरीब परिवाराची जबाबदारी घ्या. यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी असू शकत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.