गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (12:12 IST)

82 वर्षाची आजी करोनाला मात देणारी महाराष्ट्रातील सर्वाधिक वयस्कर रुग्ण

करोनापासून ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे आतापर्यंत कळत आहे तरी इच्छा शक्तीच्या बळावर कोणताही आजार जिंकता येतो हे मुंबईच्या 82 वर्षीय आजीने सिद्ध केलं आहे. आजींनी करोनावर मात केली आहे आणि त्यांना आता डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
 
या आजी काही दिवसांपूर्वीच गुजरातहून मुंबई आपल्या घरी परतल्या होत्या. खबरदारी म्हणून कुटुंबीयांनी वैद्यकीय चाचणी केल्यावर करोना पॉझिटिव्ह रिर्पोट आली नंतर त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं होतं. तिथं सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर ती करोनामुक्त झाली आहे.
 
करोनावर मात करणारी आजी राज्यातील सर्वाधिक वृद्ध व्यक्ती ठरली आहे. तसेच केरळमधील 93 वर्षीय आजोबा व 88 वर्षीय आजी हे करोनावर मात करणारं देशातील सर्वात वयस्कर जोडपं ठरलं आहे.