शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:06 IST)

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. 
 
“जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना मारहाण केलेल्या अनंत करमुसे याला भेटण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जात असताना मुंबई पोलिसांनी मला ताब्यात घेत रोखलं. मी सकाळी ११ वाजता त्याची भेट घेणार होतो,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
 
यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी पोलिसांनी आपल्याला अटक केल्याचं म्हटलं आहे. “पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.