मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (16:07 IST)

टिकटॉक व्हिडिओ बनविणे पडले महाग, पोलिसांकडून अटक

मुंबईतील सामसूम रस्त्यांवर टिकटॉक व्हिडिओ करणारे महाभाग आता पोलिसांच्या रडारवर आहेत. रेहान फिरोज खानला (४८) पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना कायद्याखाली गुन्हा नोंदवलाय. रेहानने बीपीटी रोडवर टिकटॉक व्हिडिओ करून व्हायरल केला. आर सी एफ पोलिसांनी अटक केली आहे.अटकेनंतर मात्र पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन रेहान करत आहे 
 
या मॅडम चक्क दागिने घालून, मेकअप करुन मुंबईतल्या रस्त्यांवर गाडी चालवत होत्या. बीपीटी रोडवर या मॅडम ड्रायव्हिंग करत होत्या. त्याचा टिकटॉक व्हिडीओही तयार केला. हे सगळं करण्याचा उद्देश एकच, तो म्हणजे लॉकडाऊनला धाब्यावर बसवून मुंबईत आपण कसे बिनधास्त फिरतोय हे दाखवणं. अखेर पोलिसांनी चमकोगिरी करणाऱ्या या मॅडमला अटक केली.