1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 26 मार्च 2020 (17:21 IST)

मुंबईत Lockdown मध्ये घराबाहेर पडणार्‍या भावाची हत्या

stay at home
करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर केले गेले असून नागरिकांच्या घऱाबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोस्त असून लोक घराबाहेर पडू नयेत याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुंबईत लॉकडाउन असतानाही घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला त्याच्याच भावाने मारल्याची बातमी आहे. कांदिवलीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मी ठाकूर याचा धाकटा भाऊ पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता आणि या दम्यान आपल्या घरी परतला होता. आरोपीने आपल्या भावाला लॉकडाउनमुळे घराबाहेर निघू नको असं वारंवार सांगूनही त्याने ऐकलं नाही त्यामुळे त्याची हत्या केली.
 
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.