1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (22:46 IST)

अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही

उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत म्हटलं की आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. 
 
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 24 तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. जनतेच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
 
जीवनाश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत असल्यावरही काही ठिकाणी कारण नसताना गर्दी होतं आहे पण असे करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत, लोकांनी परिस्थिीतचं गांर्भीय समजावं, असं देखील म्हणाले.
 
जनतेची वागणूक बघून धक्का बसत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आणि लोकांना नियमाचे पालन करण्याची विनंती केली.