रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (10:51 IST)

Coronavirus: महाराष्ट्रात 15 नवे करोनाग्रस्त

महाराष्ट्रात 15 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. एका दिवसाच्या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही 89 झाली आहे.
 
महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेमहाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. 
 
सोमवारी सकाळपासून खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे आणि हे चुकीचं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की लोकांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, घरातून बाहेर पडू नये, संयम पाळावा. अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत असणार्‍यांवर कारवाई करावी लागेल असाही इशारा टोपे यांनी दिला आहे.