शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 22 मार्च 2020 (14:54 IST)

महाराष्ट्रात करोनाचा दुसरा बळी

मुंबईत 63 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनामुळे हा दुसरा मृत्यू आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. 21 मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 
 
माहितीनुसार, या व्यक्तीला डायबेटिस, उच्च रक्तदाब आणि ह्दयाशी संबंधित आजार होता. करोनाची लागण झाल्याने त्यांना दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांचा आकडा सतत वाढत चालला असून आज करोनाचे १० नवे रुग्ण सापडले असून यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा 74 वर पोहोचला आहे. मुंबईत सहा आणि पुण्यात चार नवे रुग्ण सापडले आहेत. यामधील पाच जणांनी परदेश दौरा केला होता तर इतर चार यांच्या संपर्कात आले होते.