शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (18:35 IST)

हुश्श, यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला

गायिका कनिका कपूरने शुक्रवारी तिला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. तिच्या संपर्कात दुष्यंत सिंग, वसुंधराराजेंसह बडे नेते-अधिकारी आले होते. त्यांनाही करोनाची लागन झाल्याचा संशय होता. त्यामुळे या दोघांसह अनेकांनी स्वतःला क्वॉरंटाइन करून घेतलं होतं. आता भाजपा खासदार दुष्यंत सिंग आणि वसुंधरा राजे यांना करोना रिपोर्ट आला आहे.
 
कनिका कपूरला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच करोनाचा धसका घेतला होता. त्यातील काहींनी स्वतःला क्वॉरंटाइन करून घेतलं होता. त्यात दुष्यंत सिंहही होते. त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.