1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (18:23 IST)

टाळ्या वाजवून मदत मिळणार नाही, राहुल गांधी यांचे ट्विट

Rahul Gandhi
देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यापासून ते रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही मोदींनी केलं. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवत कौतुक करण्याचं आवाहनही मोदींनी केलं.
 
याच विनंतीवरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. करोनामुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजदूर यांना फटका बसला आहे. टाळ्या वाजवून यांना मदत मिळणार नसल्याचं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.