गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (09:35 IST)

रविवारी देशभरातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद

येत्या २२ मार्चला पाळण्यात येणाऱ्या जनता कर्फ्युच्या दिवशी देशभरातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन  सुटणार नाही.  तसेच अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ मध्यरात्रीपूर्वी  सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना निर्धारित स्थानकापर्यंत पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच २० आणि २१ मार्चला पुणे आणि मुंबईतून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मात्र, या काळात मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सुरु राहणार आहे. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे ८० टक्के गाड्या सोडण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
 
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी जवळपास ९० रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून बंद ठेवण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांना देण्यात येत आहे, तसेच त्यांचे तिकीटाचे पैसेही परत करण्यात येणार आहेत.