शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (14:11 IST)

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप

भारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.70 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजनुसार, देशातील 80 कोटी गरीब जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप करणार येईल.
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करत सांगितले की देशातील 80 कोटी गरिब जनतेला जी देशाच्या दोन तृतीयांश आहे, त्यांना प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो गहू किंवा तांदूळ मिळतो आहे. यामध्ये आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच 1 किलो डाळ यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.