गरजूच्या मदतीसाठी ' दादा' चा पुढाकार, दिले ५० लाख
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोलकाता सरकारला मदत करण्यासाठी गांगुलीने नुकतंच इडन गार्डन स्टेडियम खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला. याहीपुढे जात गांगुलीने कोलकातातील गरजूंना ५० लाख किमतीचे तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
गांगुली आणि लाल बाबा राईस यांनी पुढाकार घेताना गरजूंना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. या तांदूळासाठी जवळपास ५० लाख रुपये मोजले गेले आहेत. कोरोना व्हायरसपासून सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना हे धान्य देण्यात येणार आहे. गांगुलीच्या या पुढाकाराने अनेकजण पुढे येतील आणि मदत करतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनुक्रमे २५ आणि ५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.