बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सायकलवारी अपघात : मरावे परी देह रुपी उरावे

नाशिकमधल्या सायकलवारीत प्रेम सचिन नाफडे या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत हा मुलगा जागीच मरण पावला.

प्रेमच्या आई वडिलांनी त्याचे  देह दान करण्याचे ठरवले आहे. प्रेमचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देहदान करण्याची इच्छा प्रेमच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे.

दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना असा निर्णय घेण्याचं जे धाडस त्यांनी दाखवलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्वचा आणि नेत्रदान केलं जाणार आहे.