कान आणि मेंदूमध्ये गाठ, नाशिकमध्ये इजिप्तच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
कान आणि मेंदूमध्ये ग्लोमस जुगीलर’ नावाची गाठ (ट्यूमर) तयार होते किंबुहुना उद्भवते. या आजाराने मागील काही महिन्यांपासून इजिप्त देशातील ‘कैरो’ शहराच्या निवासी असलेल्या हनीम अलसईद फर्क ही महिला त्रस्त होती. त्यांचादेश इजिप्तमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आजारावर उपचार करण्यास असमर्थता दाखवली आणि महिला रूग्णाला अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांत जाण्याचा सल्ला दिला, मात्र इजिप्तच्या एका डॉक्टरने त्यांना नाशिकमध्ये असलेल्या कान-नाक घसा तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या रूग्णालयात आठवडाभरापूर्वी ते दाखल केले होते.
मुंबईनाका परिसरातील रूग्णालयात त्यांच्यावर इंदोरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण चमूने अकरा तासांचे परिश्रम घेत गुंतागुंतीची, अत्यंत अवघड अशा जागेवरील गाठीवर ‘अॅकॉस्टिक न्यूरोमा’ नावाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली असून महिला रुग्ण आता बरी आहे. याबद्दल इंदोरवाला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर या महिला रूग्ण पुर्णत: सामान्य असून ते दोन दिवसांत इजिप्त या मायदेशी आनंदाने परतणार आहे. . नाशिक हे मेडिकल हब च्या दिशेने वाटचाल करत असून ही शस्त्रक्रिया झाल्याने आता पूर्ण जगात आपल्या देशाचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे मोठे नाव झाले आहे.