गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (16:23 IST)

कोरोना लस शोधण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शर्थीचे प्रयत्न

कोरोना विषाणूची लस शोधण्यासाठी विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. लस शोधण्यासाठीच्या प्रयत्नांत असणारे एकूण सात प्रयोग हे क्लिनिकल टेस्टींगच्या टप्प्यातून पुढे आलेले आहेत. तर, काही या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. चीन आणि अमेरिकेमध्ये या चाचण्यांच्या प्रयोमगाने वेग धरला आहे. तर, जर्मनीमध्ये या महिन्याअखेरीस लस शोधण्याच्या प्रयोगांची सुरुवात होणार आहे. 
 
ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यास येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सर्वतोपरी पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी गुरुवारी दिली. जिथे या टप्प्यापर्यंत पोहोचण्यास वर्षानुवर्षांचा कालावधी लागतो तिथेच आता आश्वासक प्रगती दिसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. लसीच्या चाचणीसाठीच्या पहिल्या टप्प्यात १११२ स्वयंसेवकांना कोविड 19 विरोधातील लस दिली जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात त्याची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याची चाचणी होणार आहे.