सोमवार, 8 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (22:01 IST)

नेटफ्लिक्सला दीड कोटीपेक्षा अधिक नवे सब्सक्राइबर्स मिळाले

Netflix adds 15 million subscribers
लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या अनेकांनी मनोरंजनासाठी विविध अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाइटचा आधार घेतला आहे. यात जगभरातल्या अनेकांनी नेटफ्लिक्सला सबस्क्राइबर  केलं आहे. त्यामुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १५.७७ मिलियन म्हणजे जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स मिळाले आहेत.
 
लॉकडाउन असल्यामुळे या काळात ७ मिलियन नवे सबस्क्राइबर  मिळतील असं कंपनीला वाटत होतं. मात्र त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त युजर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात जवळपास ६४ मिलियन लोकांनी ‘टायगर किंग’ डॉक्युमेंट्री पाहिली आहे. तर नेटफ्लिक्सचा ओरिजन चित्रपट ‘सस्पेंसर कॉन्फेंडेशिअल’ला ८५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
 
नेटफ्लिक्सप्रमाणेच ऑल्ट बालाजीच्यासबस्क्राइबरमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कंपनीला १७ हजार नवे सबस्क्राइबर  मिळाले आहेत.