बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (12:39 IST)

Facebook ने खास चॅटिंग अॅप Tuned केलं लॉन्च, जाणून घ्या काय आहे खास

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने कपल्ससाठी नवीन चॅटिंग अॅप Tuned लॉन्च केलं आहे. या अॅपद्वारे कपल्स चॅटिंगॅसह फोटो आणि म्यूझिक देखील शेअर करु शकतात. 
 
सध्या हा अॅप आयओएस प्लेटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि याला कॅनडाचे यूजर्स वापरत आहेत. तसेच कंपनीने हा अॅप अॅड्रायडवर कधी लॉन्च करणार हे स्पष्ट केलेले नाही.  
 
तर जाणून घ्या फेसबुकच्या लेटेस्ट मोबाइल अॅपबद्दल-
फेसबुकचा हा अॅप केवळ कपल्ससाठी असून येथे पार्टनर्स एकमेकांशी महत्त्वाचे क्षण शेअर करु शकतात. सोबतच कपल्सला या अॅपमध्ये म्युझिक, लव्ह नोट्स, फोटो, व्हाईस नोट आणि आपल्या गोष्टी शअेर करण्याची सुविधा ‍मिळेल. या व्यतिरिक्त चॅटिंग दरम्यान स्टिकर्स देखील वापरता येतील. तसेच या अॅपला स्पॉटिफायसह कनेक्ट करता येईल, ज्याने यूजर्स आपल्या पार्टनरसोबत गाण्यांची प्लेलिस्ट शेअर करु शकतील.