शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुककडून बोनस जाहीर

फेसबुकने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना थोडाथोडका नव्हे तर १००० डॉलर्सचा (तब्बल ७४ हजार) बोनस जाहीर केला आहे. Work from home चा पर्याय स्वीकारून कोरोनाला पायबंद घालण्यात कंपनीची मदत केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. 
 
सध्याच्या घडीला फेसबुकचे जवळपास ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. या प्रत्येकाला एप्रिल महिन्यात १ हजार डॉलर्सचा बोनस मिळेल. परंतु, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या लंडनमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर फेसबुककडून सिंगापूर आणि लंडनमधील कार्यालय बंद करण्यात आले होते. कंपनीने सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
याशिवाय, करोना व्हायरसने प्रभावित झालेल्या छोट्या व्यवसायिकांना मदत फेसबुक मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी  ३० देशांतील ३० हजार छोट्या व्यवसायिकांना ७४१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 
 
सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार – उदय सामंत
 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
सामंत म्हणाले, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क  सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल. सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवर संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला.