गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (13:23 IST)

31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला बँकांचा देशव्यापी संप, दहा लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग

Banks' nationwide shutdown of January 1 and February 1
पगारवाढ, सेवाशर्तींमधील सुधारणा या आणि अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.
 
या संपामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकातील मिळून दहा लाख कर्मचारी सहभागी होतील. या संपामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली AIBEA, NCBE, आयबोक, बेफी, इन्बोक, इन्बेफ, नोबो अशा नऊ बँकिंग संघटनाही सहभागी होतील.
 
या बैठकीपूर्वी 30 जानेवारीला मुख्य कामगार आयुक्तांसोबत युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. बैठकीत तोडगा न निघाल्यास कर्मचारी संपावर जातील.
 
या दोन दिवसीय संपानंतरही कोणता तोडगा निघाला नाही तर 11,12,13 मार्चला पुन्हा संप करण्याचा इशारा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दिला आहे.