रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (12:27 IST)

केंद्रीय कर्मचार्‍यांना बजेटनंतर वेतनवाढ?

सातव्या वेतन आयोगानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांना वेतनवाढीचे गिफ्ट मिळू शकते. केंद्र सरकार येणार्‍या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि निवृत्तिधारकांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करु शकते. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी कर्मचार्‍यांना लाभ मिळू शकतो. 
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सरकारच्या या घोषणेनंतर डीए 17 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर पोहोचणार आहे. केंद्र सरकार यावर्षी मार्चमहिन्यात याची घोषणा करु शकते. यामध्यमातील वृत्तांनुसार, श्रेणी-1 च्या कर्मचार्‍यांसाठी डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास पगारात कमीत कमी 720 रुपांपासून जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 5 हजार रुपयांपासून 21 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
 
जानेवारी 2019 मध्ये केंद्राने सरकारी कर्मचार्‍यांसाठी डीए 3 टक्के वाढवला होता. यापूर्वी गुजरात सरकारने आपल्या राज्याच्या सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 5 टक्के वाढवला होता.
 
दरमन, 1 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत वार्षिक अर्थसंकल्प मांडणार आहेत.