गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लुसाने , मंगळवार, 17 मार्च 2020 (16:29 IST)

कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्यास ऑलिम्पिक समितीच्या सूचना

चीनमधून पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसचा वाढता धोका रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लुसाने येथे असलेल्या आपल्या मुख्यालयात सर्व कर्मचार्‍यांना सोमवारपासून घरातूनच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आयओसीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, लुसानेस्थित त्यांच्या मुख्यालयातील सर्व कर्मचारी सोवारपासून वर्क फ्रॉम होम करतील.
 
ऑलिम्पिक संग्रहालयात प्रतिदिन जवळ-जवळ 1 हजार पर्यटक येतात. त्यामुळे सोवारपासून हे संग्रहालयही दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
 
आयओसीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संक्रमित लोकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही उपाय केले जात आहेत.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोरोना व्हारसचा वाढता धोका रोखण्यासाठी मदत मागितली आहे. 24 जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. सध्या तरी आयओसी स्टाफमधील कोणाही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब निदर्शनास आलेली नाही.