रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (09:42 IST)

फेसबुककडून करोना व्हायरसचा प्रतिबंधासाठी एलर्ट जारी

जगभरातले लोकप्रिय सोशल मिडियाचे प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकनेही करोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी एलर्ट जारी केला आहे. करोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी काय करता येईल यासाठीचा हा एलर्ट आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या दाखला देत हा एलर्ट फेसबुककडून युजर्ससाठी पाठवण्यात आला आहे.
 
ही आहे डब्ल्यूएचोची दक्षिण आशियासाठीची लिंक
t.ly/1kDyB
 
जेव्हा आपल्या आरोग्याशी संबंधित गोष्ट येते, तेव्हा प्रत्येकाला स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काय सर्वोत्तम आणि उपयुक्त आहे या गोष्टींची तातडीने गरज भासते. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या निर्देशांचा संदर्भ या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. फेसबुकने युजर्ससाठी who.int ही जागतिक आरोग्य संघटनेची लिंकदेखील शेअर केली आहे.
 
कोविड १९ च्या भारतातल्या आणि इंडोनेशियातल्या नोंदवण्यात आलेल्या केसेसचा संदर्भही देण्यात आला आहे. प्रत्येक देशानुसार या प्रकरणांची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई भागातील माहिती भारतातील युजर्ससाठी जारी करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये आतापर्यंत १९२ करोनाशी संबंधित रूग्णांची नोंद झाली आहे. या प्रकरणात २ जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा डब्ल्यूएचओकडून जाहीर करण्यात आला आहे.