रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

गुगलने क्रोम युजर्स, ब्राऊजर तातडीने अपडेट करा

आघाडीची टेक कंपनी गुगलने क्रोम वापरणाऱ्या सर्व युजर्सना ब्राऊजर तातडीने अपडेट करण्याची सूचना केली आहे. गुगल क्रोममध्ये सुरक्षाविषक त्रुटी आढळल्यामुळे कंपनीने क्रोम तातडीने अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. क्रोममधील त्रुटींबाबत कंपनीला योग्यवेळी माहिती मिळाली. 
 
त्यानंतर तातडीने आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आणि युजर्ससाठी लेटेस्ट अपडेट 80.0.3987.122 रोलआउट केले, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्या त्रुटींचा हॅकर्सना फायदा होऊन युजर्सची निरनिराळ्या प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता होती किंवा एखादं उपकरण थेट हॅक केलं जाण्याचीही शक्यता होती. Forbes च्या रिपोर्टनुसार, त्रुटींचा शोध गुगल सिक्युरिटी टीमच्या आंद्रे बर्गल यांनी लावला, त्यांना बक्षीस म्हणून 5000 डॉलरही देण्यात आले.