सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (08:20 IST)

क्वीन बनणार 'एअरफोर्स पायलट'!

कंगना राणावतच्या आगामी 'तेजस' या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. कंगनाच्या टीमने तिचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात ती एअरफोर्सच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. या फोटोत सैन्याचा गणवेश परिधान केलेल्या कंगनाने हातात हेल्मेट घेतले आहे, काळा चष्मा घातला आहे. कंगनाच्या मागे एक लढाऊ विमानही दिसते आहे. हा लूक शेअर करताना कंगनाच्या टीमने कॅप्शनमध्ये लिहिले, ङङ्गदेशासाठी रात्रंदिवस मेहनत करणार, गणवेशधारी शूर महिलांसाठी...' कंगना तिच्या पुढच्या चित्रपटात एअरफोर्सच पायलटची भूमिका साकारणार आहे.
 
तेजस असे या चित्रपटाचे नाव असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत आहेत तर रॉनी स्क्रूवाला हे निर्माते आहेत. हा चित्रपट करण्यासाठी  कंगना उत्सुक असून, आनंद व्यक्त करत ती म्हणाली की, मला नेहमीच रुपेरी पडद्यावर सैनिकाची भूमिका करायची होती. लहानपणापासूनच मी सैन्याबद्दल खूप उत्साही आहे. मी नेहमीच देशाच्या सैनिकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला त्यांचा गर्व आहे आणि मी त्यांचा मनापासून आदर करते.'