रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

coconut water
Last Updated: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (15:31 IST)
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळ पाणी आजरांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. परंतू एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आले आहे ज्यात रुग्णांना नारळ पाण्यात दारू मिसळून पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहेत.

हा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये समोर आला आहे. रुग्णांच्या मागणीवर त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून नारळाच्या पाण्यात दारु टाकून दिलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेडिकलच्या वॉर्डसमध्ये नारळावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीच वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

मेडिकलमधील काही रुग्णांच्या आग्रहावरून त्यांचे नातेवाईक लपून-छपून त्यांना दारू पोहचवत असतात. वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असले तरी नारळ पाणी असल्याचे सांगून पुरवठा केला जातो. काही दिवसांआधी येथील डॉक्टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सूक्ष्म निरीक्षण केले असता रुग्णाचे नातेवाईकच नारळ पाण्यात मिळवून दारू येथे आणत असल्याचे आढळले.

दारू भरलेले नारळ पाणी पिऊन झाल्यावर रिकामे नारळ थेट वरच्या वार्डातून खाली फेकले जाते. त्यामुळे येथील मल वाहिनी अवरुद्ध होण्याची भीती आहे तसेच खाली उभे असणार्‍यांच्या डोक्यावर पडून ते जखमी होण्याची भीती देखील आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णाला नारळ पाणी द्यायचे असेल तर ते ग्लासमध्ये देण्याची मागणी
वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, 28155 रुपयांना ...

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, 28155 रुपयांना 10 ग्रॅम सोने घरी आणा
सोन्याचा दर आज 8 डिसेंबर : सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48000 च्या पुढे गेला आहे. आज, ...

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर MI-17 V5 मध्ये कोण - कोण होतं

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर MI-17 V5 मध्ये कोण - कोण होतं
नवी दिल्ली- हवाई दलाच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टर MI-17 V5 मध्ये एकूण 9 जण होते. सीडीएस ...

झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढण्यात आले

झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढण्यात आले
झूम मीटिंगच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरून कमी करणारा अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल ...

MI-17 V5 अपघात, CDS जनरल रावत रुग्णालयात दाखल, गंभीर जखमी, ...

MI-17 V5 अपघात, CDS जनरल रावत रुग्णालयात दाखल, गंभीर जखमी, अन्य 4 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली- तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी IAF MI-17 V5 हेलिकॉप्टर कोसळले. संरक्षण ...

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ...

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, CDSबिपिन रावत कुटुंबासह विमानात होते
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये ...