बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (15:22 IST)

गुंडाकडे सापडल्या अनेक आलिशान गाड्या आणि बाईक

नागपुरातील गुंड संतोष आंबेकराला अटक केल्यानंतर त्याच्याकडील संपत्तीही जप्त करण्यात आली. ही संपत्ती पाहून साऱ्यांचेच डोळे पांढरे झालेत. या संपत्तीत अनेक आलिशान गाड्या आणि बाईकचाही समावेश आहे. 
 
फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आंबेकरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्या साथिदारांकडून तब्बल पाच कोंटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली. यात पाच महागड्या गाड्या, २ बाईक्स, चांदीचं सिंहासन आणि रोकड याचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गजानन साजमाने यांनी दिलीय. आंबेकरची दहशत रोखण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात नेताना त्याची रस्त्यावरुन परेडच काढली.