मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (12:59 IST)

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत

महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 
 
भारताने न्यूझीलंडला 134 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न कमी पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले.
 
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. स्मृती मानधनाचा भारताला पहिला धक्का बसला. नंतर शफाली वर्मा (46) आणि तानिया भाटीया (23) यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. 
 
यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली. तानियाने 25 चेंडूत 23 धावा केल्या. खेळपट्टीवर येताच जेमिमाने फटकेबाजी सुरू केली पण 8 चेंडूत 10 धावा करून ती माघारी परतली. हरमनप्रीत देखील 1 धाव करुन बाद झाली. न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला आणि वेदा कृष्णमूर्ती बाद झाली. खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. भारतला सातवा धक्का दिप्ती शर्माचा बसला. ती 11 चेंडूत 8 धावा घेतल्यानंतर बाद झाली. नंतर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला 133 धावांचा टप्पा गाठून दिला.
 
या प्रकारे भारताने 6 गुणांसह अव्वल स्थान कायम राखत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

फोटो: ट्विटर