शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (11:47 IST)

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत असून जगभरातून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. महाराष्ट्राची शान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानंही शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. 
 
ट्विटरच्या माध्यमातून क्रिकेटचा दैवत मानले जाणारे सचिनने महाराजांना मानवंदना दिली आहे. सचिनने शिवाजी महाराजांचा एक फोटो ट्विट करून शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
'प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.' असं सचिननं ट्वीट केलं आहे. 
 
सोबतच #ShivajiMaharaj #ShivJayanti असे हॅशटॅगही दिले आहेत.