बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (11:07 IST)

सचिन तेंडुलकरने जिंकला लारेस 20 स्पोर्टिंग मोमेंट 2000-2020 अवॉर्ड, क्रीडा विश्वातला ऑस्कर

मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरच्या नावावर एक अजून रेकॉड बनला. सचिनने लारेस 20 स्पोर्टिंग मोमेंट 2000-2020 अवॉर्ड जिंकला. 
 
बर्लिनमध्ये आयोजित लारेस वर्ल्ड स्पोर्टस अवार्ड कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या नावाची घोषणा केली गेली. या अवॉर्डला खेळांचा ऑस्कर म्हटलं जातं.
 
2011 मध्ये भारत विश्वचषकात विजेता बनल्यावर सचिन तेंडुलकरचं स्वप्न साकार झालं होतं. 2 एप्रिल 2011 रोजी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे
 
या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदार नामांकित होते. सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सचिनला या चषक देऊन सन्मानित केलं. या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. 
 
क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे. 2000-2020 या 20 वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.