1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिन तेंडुलकर वाढदिवस विशेष: जेव्हा मित्रांनी चायनीज खाण्याचा मजा विस्कटला

sachin tendulkar
क्रिकेटचे दैवत म्हणून प्रसिद्ध मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा आज 46 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला जाणून घ्या एक रोचक किस्सा. सचिन खाण्याचे खूप शौकिन आहे परंतू त्यांचा चायनीज खाण्याचा पहिला अनुभव खूप वाईट होता कारण त्यांना उपाशी पोटी राहावे लागले होते.
 
तेंडुलकर यांना आपल्या आईच्या हाताचे जेवण खूप पसंत आहे. परंतू वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी चायनीज फूड टेस्ट केले. मुंबईत 1980 च्या दशकात चायनीज खूप प्रसिद्ध होत होतं. या बद्दल जाणून स्वाद चाखण्यासाठी गल्लीतील मित्रांनी मिळून चायनीज खाण्याचे ठरवले.
 
तेंडुलकर यांनी नवीन पुस्तकात ही घटना आठवत सांगितले आहे की आम्ही 10-10 रुपये गोळा केले. 10 रुपयाला तेव्हा खूप किंमत होती परंतू नवीन काही स्वाद चाखण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. परंतू ती संध्याकाळ निराश करणारी ठरली कारण मला त्या ग्रुपमध्ये सर्वात लहान असल्याची किंमत चुकवावी लागली.
 
आम्ही रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि स्वीट कार्न सूप ऑर्डर केलं. आम्ही लांब टेबलवर बसलो होतो आणि माझ्यापर्यंत सूप पोहचेपर्यंत ते कमी प्रमाणात उरलं होतं. ग्रुपच्या मोठ्या मोठ्या मुलांनी सूप संपवलं होत आणि लहानांसाठी अगदी थोडं सूप उरलं होतं परंतू हे इतपत सीमित नव्हतं.
 
त्यांनी सांगितले की चीज फ्राइड राईस आणि चाउमिन या डिशेसदेखील केवळ 2-2 चमचे खायला मिळाल्या. मोठ्या मुलांना आमच्या पैशांनी मौज केली आणि मी घरी उपाशी पोहचलो. हॅचेट इंडियाने मुलांसाठी 'चेज योर ड्रीम्स' नावाची पुस्तक लिहिली आह. पुस्तक तेंडुलकर यांच्या आत्मकथा 'प्लेइंग इट माई वे' वर आधारित आहे.